शिवकालीन इतिहास व चालू घडामोडी

Blogger

ऐतिहासिक माहिती अप्रतिम छायाचिञे,
शिवकालीन इतिहास वाचण्यासाठी जरूर लाईक करा...

2:52
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले लोहगड फत्ते सहभागी सर्व दुर्गसेवकांचे हार्दिक आभार. मोहिमेत करण्यात आलेली कामे १ :- नारायण दरवाज्याच्या समोर ठेवण्यात आलेल्या तोफेवर पडलेला दगड काढून सर्व तोफा पुन्हा असे होणार नाही या दृष्टीने योग्य ठिकाणी ठेवण्यात आल्या. २ :- नारायण दरवाज्याच्या वरील बाजूस असणाऱ्या शौचकूपात (Toilet) पडलेला दगड काढण्यात आला तसेच शौचकूपाचे तोंड बंद झाल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ते तोंड मोकळे करून त्यातील पाणी काढण्यात आले. ३ :- विंचूकाटा माचीवर असलेल्या चिलखती बुरुजाजवळ दगडी पडल्या होत्या त्या काढण्यात आल्या. #विशेष_आभार : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण #सह्याद्रीचे_दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
6 months ago
0:17
छञपती शिवरायांची आरती पाठ करून ठेवा..... 👇 जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!! आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला आला आला सावध हो भूपाला सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१ श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२ त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३ ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला देशास्तव शिवनेरी घेई देहाला देशास्तव रायगडी ठेवी देहाला देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४ बोला शिवाजी महाराज की ... जय !!
6 months ago
12:43
१३ जुलै १६६० सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे.उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली.आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले.खळाळणार्‍या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची.दिवस सरला. खिंडीत अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते. आधी धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली. अंधार वाढत चालला. आणी कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. अन् आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्यात खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला ! बाजी कोसळले ! छाती फुटली ! तरिही बाजी आनंदातच होते. "स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो." हाच तो आनंद होता. गजापूरची खिंड पावन झाली होती. (दि. १३ जुलै १६६०, सायंकाळी सुमारे ७.३० वाजता)
6 months ago
3:06
गनिमीकावा.... लहानशा सैन्यानिशी कमीतकमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यानिशी फत्तेखानावर मात कशी केली शिवरायांनी जाणून घ्या.... विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला। त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू। त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ‘ सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही. अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस. नीरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच , कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते. शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला। प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला. कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला। सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू. हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं. मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली। काही मराठेही युद्धात पडले। मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली हो ती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली. अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘ सर्जाराव ‘ असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता. बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता. पण बाजी जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले. ते ही गडावर आले. रात्रीची वेळ , पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती. महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकुम दिला की , पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे घडीभरात जमले. महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले , ‘ आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावर कसलाही मारा करूनका। येऊ द्यात त्याला वर। आम्ही इशारत करू अन् मग तुम्ही शत्रूवर या मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा. ‘ सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते. महाराजांचा अंदाज अचूक ठरला। उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत चढलीही. अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला. अन् गर्जना सुरूझाल्या. शिंगे धुत्कारूलागली. अन् मग ते लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला. कुणी मेलं , फारजण जखमी होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता. फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच झाला। अन् म्हणाला , ‘ यह तो पत्थरों की बौछार है! ‘ आता ? मावळ्यांना चेव आला होता। केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता. गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या मारीत , पडत , घसरत , दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होतं. जणू वादळातला पालापाचोळा. या फत्तेखानाची आता फळी फुटली होती. महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले. अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम सासवड गावात आश्रयाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं. #shivajimaharajhistory आवर्जून शेअर करा कळूद्या जगाला इतिहास माझ्या राजाचा.....
7 months ago
1:00
किल्ले हरिहर कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे. पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. #हरिहर #किल्ला #नाशिक #सह्याद्री #wonders_of_sahyadri विडीओ - अक्षय सरोदे #shivajimaharajhistory © माहितीचे हक्क राखिव आहेत. त्यांचा वैयक्तिक म्हणून कोणीही गैरवापर केल्याचे आढळल्यास अथवा ती स्वतःची म्हणून प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल.
7 months ago
0:14
कातळधार धबधबा पुण्याकडून गेले तर लोणावळामार्गे आणि मुंबईकडून आले तर कर्जतमार्गे या किल्ल्यावर वाट येते. याच डोंगराच्या पोटात आहे एक रौद्र, भीषण असा कातळधार धबधबा. पुण्याकडून लोणावळामार्गे राजमाची या किल्ल्यावर जाण्यासाठी आता कच्चा गाडीरस्ता झालेला आहे. लोणावळ्यापासून अंदाजे पाच कि.मी. गेले की मुख्य रस्ता सोडून एक पायवाट डोंगरात खाली उतरते. ही पायवाट दोन टप्पे खाली उतरते. तिथून ती उजवीकडे वळते आणि डोंगराच्या पोटातून कडेकडेने पुढे सरकत राहते. काही अंतर पार केल्यावर परत एका छोटय़ाशा टेकडावर ही वाट चढते. इथे आल्यावर आपल्याला त्या जलप्रपाताचा गंभीर आवाज ऐकू येऊ लागतो आणि त्या धबधब्याच्या पाण्याचे तुषार उंच उडताना दिसू लागतात. तसेच पुढे गेले की आपले पाय थबकतात आणि नजरबंदी झाल्यासारखे आपण स्तब्ध उभे राहतो. समोर दिसणारे दृश्य हे खरेतर शब्दातीत आहे. डोंगरमाथ्यावरून एक प्रचंड मोठा धबधबा समोर दरीत कोसळत असतो. आपण साधारणत: या धबधब्याच्या मध्यावर एका बाजूला उभे असल्यामुळे संपूर्ण जलप्रपात आपल्या नजरेस पडतो. सुमारे सहाशे फूट उंचीवरून हे पाणी खाली कोसळत असते. ते जिथे पडते तिथे खूप मोठा डोह तयार झाला आहे. तो डोह संपूर्ण भरल्यामुळे तिथून ते पाणी पुढे अजून खाली वाहत त्याचे रूपांतर नदीमध्ये झालेले दिसते. अतिशय निसरडय़ा वाटेने या डोहापर्यंत जाता येते. परंतु इथे गिर्यारोहणाची काही साधने आणि कुशल मार्गदर्शक असेल तरच आणि केवळ तरच जावे. अन्यथा या ठिकाणी उभे राहूनसुद्धा कातळधार धबधबा आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्ग अप्रतिम दिसतो आणि अनुभवता येतो. कुशल मार्गदर्शक आणि आवश्यक साधने असतील तर या डोहापर्यंत उतरता येते. डोहाच्याच शेजारी आणि धबधब्याच्या पोटात डोंगरात एक मोठी गुहा तयार झालेली आहे. त्या गुहेत गेले तर आपल्या समोर या कातळधार धबधब्याच्या पाण्याची सफेद भिंत तयार झालेली दिसते. गुहेत पाण्याचे तुषार उडत असतात आणि खूप निसरडे झालेले असते. वर डोंगरावर पाऊस वाढला तर मात्र हे सफेद पाणी गढूळ होऊ लागते आणि धबधब्याचा रंग मातकट होऊ लागतो. पाण्याबरोबर अनेक दगड, गोटे खाली कोसळू लागतात. त्यामुळे पाऊस पडत असेल तर इथे कधीही जाऊ नये. लांबून दर्शन घ्यायला ऐन पावसाळा उत्तम. परंतु इथे खाली डोहापर्यंत उतरायचे असेल तर पाऊस नसताना जावे. खाली उतरणे हे धाडसी गिर्यारोहण या श्रेणीमध्ये मोडते त्यामुळे या क्षेत्रातला अनुभव हवा. Please share = आपल्यामुळे कोणालातरी वाचन्यास मिळेल #shivajimaharajhistory © माहितीचे हक्क राखिव आहेत. त्यांचा वैयक्तिक म्हणून कोणीही गैरवापर केल्याचे आढळल्यास अथवा ती स्वतःची म्हणून प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल. #shivajimaharajhistory #waterfall #wonderlust #rain #mansoon #maharashtra #rajmachi #kataldhar
7 months ago